साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेटउरणमधील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
*साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट*
*नवी मुंबई:* उरणमधील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख (Dawood Sheikh) याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशात आरोपी दाऊदला अटक केली.
गेल्या पाच दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दाऊद शेख याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान दाऊद शेख याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. 29 जुलैला रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान यशश्री शिंदे प्रकरणात एक जुनं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये दाऊद शेख हा यशश्रीचा पाठलाग करीत असताना दिसत आहे. 25 जुलै रोजी दुपारी 2.14 वाजता यशश्री स्टेशन रोडवरून उरण स्टेशनकडे जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये साधारण 2.22 वाजता आरोपी दाऊददेखील त्याच मार्गाने यशश्रीच्या पाठीमागे जात असल्याचे दिसत आहे. हत्येच्या दिवशी दुपारी यशश्रीचा पाठलाग करत असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यशश्री शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता. तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगावरही वार केले होते. छातीवर वार करण्यात आले होते. काही वृत्तसंस्थांनुसार, तिचे स्तनही कापण्यात आले होते. इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू होता. यशश्रीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.