संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्गचे सुरू असलेल्या कामामधील दगड फोडण्यासाठी बोरवेल ब्लास्टिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. या बोरवेल ब्लास्टिंगमुळे मानसकोंड किंजळेवाडी येथील अनेक घरांना तडे गेले असुन ज्या ठिकाणीघरे,शाळा,मंदीर,दर्गा,मस्जिद,देऊळ किंवा रहदारी आहे त्याठिकाणी बोरवेल ब्लस्टिंग वर बंदी घालण्यात आली होते तसे लेखी आदेश जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी कंपनीला आणि संबंधित विभागाला दिले होते.मात्र जे एम म्हात्रे कंपनीच्या वरिष्ठकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशा केराची टोपली दाखवली असुन मानसकोड किंजळेवाडी गावातील घराना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. मानसंकोंडच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची नोद घेवून जिल्हाधिकारी यांनी राष्टीय महामार्गावरील बोरवेल ब्लस्टिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश देऊन ही मनमानी करुन बोरवेल ब्लस्टिंग सूरू आहे. ग्रामपंचायतीने याला विरोध करून सुद्धा संबंधित ठेकेदारांचे कामगार जाणून-बुजून लोकांना त्रास देण्याचे काम करत आहे.ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रमुखाला जिल्हाधिकारी यांचे आदेश दाखवले आणि टॅक्टरने कट्रोल ब्लस्टिंग करण्याची विनंती केली असता मी याच मशीन ने ब्लस्टिंग करणार कुणाला काय तक्रार करायची ती करा असे ठेकेदार यांच्या माणसाने काढले.या ठिकाणी एका वेळी 25 ते 30 पेक्षा जास्त होल मारून शंभर फुटापेक्षा खोल असे होल मारून या ठिकाणी बोरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून मानसकोड किंजळेवाडी गावातील अनेक घरांना तडे सुद्धा गेले आहेत. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला असुन रविवारी पालकमंत्री ना.उदय जी सामंत यांच्याकडे पुन्हा तक्रार करुन न्याय मागणार आहेत पीर दर्गे जवळची बोरवेल ब्लस्टिंग बंद झाली नाही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे
जाहिरात