
गोंदिया – कोहमारा महामार्गावर ट्रकच्या धडकेत एका २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पायल लाखनकर असे मृतक तरुणीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृतक तरुणी ही गोरेगावकडून कोहमाराकडे जात असताना भडंगा गावाजवळ ट्रकने मागून तिला जोरदार धडक दिली असता या धडकेत पायल हिचा जागीच मृत्यू झाला आहे.
पायक हिच्या सोबत तिची २ वर्षीय मुलगी या अपघातात जखमी झाली आहे. अपघातानंतर पोलिस तासाने घटनास्थळी झाल्याने मृतकाच्या नातेवाईकांमध्ये पोलिसांच्या विरोधात चांगलाच आक्रोश पाहायला मिळत आहे.दरम्यान आता गोरेगाव पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे पाठवला आहे व पोलीस पुढील तपास करीत आहेत.