वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूर ,02 मे-
प्रसिद्ध लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते.
अरुण गांधी यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे प्रमुख आहेत. अरुण गांधी 1987७ मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली आहे.