पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाखो नागरिकांशी १०० व्या भागात साधला संवाद
नवी दिल्ली- रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच लोक रेडिओ, मोबाईल आणि टीव्ही समोर येऊन जमले होते. कधी अकरा वाजतात आणि ‘मन की बातचा १०० वा भाग सुरु होतो याची देशातच नाही तर विदेशातील प्रत्येकालाच उत्कंठा लागून राहिली होती. अकरा वाजले आणि पंतप्रधानांचे शब्द कानावर पडले. ‘मन की बात’च्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी १०० व्या भागासाठी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले, आज ‘मन की बातचा १०० वा भाग आहे. मला तुम्हा सर्वांची हजारो पत्रे आणि संदेश आले आहेत. शक्य तितक्या पत्रातील गोष्टी वाचण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला. संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. पत्र वाचताना अनेकवेळा भावूक झालो, भावनेत वाहून गेलो आणि स्वत:ला सांभाळले १०० व्या भागासाठी तुम्ही सर्वानी अभिनंदन केले पण खरे सांगतो तुम्ही सर्व श्रोते पात्र आहात. तुम्ही सर्व देशभरातील श्रोते आहात. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून ‘मन की बातचा प्रवास सुरू केला. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे पर्व.
‘मन की बात देखील दर महिन्याला येणारे पर्व बनले.
ज्यामध्ये आपण सकारात्मकता आणि त्यात लोकांचा सहभाग साजरा करतो. या कार्यक्रमाला इतकी वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही. प्रत्येक एपिसोड नवीन आहे. देशवासीयांचे नव्या यशाचा मागोवा यात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक यामध्ये सहभागी झाले. दर महिन्याला मी देशवासीयांच्या त्यागाच्या पराकाष्ठतेचा अनुभव घेतो. या कार्यक्रमामुळे मी तुमच्या सर्वांपासून थोडंही दूर आहे असं मला वाटत नाही.
‘मन की बात हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे. लोक देवपूजेला जाताना प्रसादाचे ताट घेऊन येतात. भगवंताच्या रूपातील जनता म्हणजे जनार्दनच्या चरणी प्रसादाचे ताट आहे. माझ्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास झाला आहे. हा अहम ते वयम असा प्रवास आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘मन की बात म्हणजे स्वयं नाही
तर तुम्ही असा हा संस्कार असल्याचे मी मानतो. कल्पना करा की एक देशवासी ४०-४०वर्षांपासून निर्जन जमिनीवर झाडे लावत आहे. कोणीतरी ३० वर्षांपासून जलसंधारणासाठी विहीर बांधत आहे. कोणी गरीब मुलांना शिकवत आहे. कुणी गरिबांच्या उपचारात मदत करत आहे. ‘मन की बात’ मध्ये त्यांचा उल्लेख करताना अनेकदा मी भावूक झालो. ‘मन की बात’ मध्ये आपण ज्या लोकांचा उल्लेख करतो ते सर्व आपले हिरो असून त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम जिवंत आहे. आज आपण १००व्या भागाचा टप्पा गाठला आहे, तेव्हा मला पुन्हा एकदा या हिरोंना भेटण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.