▶️ देवेंद्र फडणवीस, कायदा सगळ्यांसाठी सारखा नाही का? संजय राऊत यांचा प्रश्न
मुंबई – बारमध्ये मद्यपान पार्टी करून बेशिस्त वर्तन करणारे भाजपशी संबंधित असलेले मोहीत कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल कारवाई करावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते मुंबईतील खार पोलीस ठाण्यात धडकले. मध्यरात्रीनंतरही बार सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मोहित कंबोज यांनी दमदाटी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता कंबोज यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
संजय राऊत यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. मोहित कंबोज यांनी यावेळी पोलिसांनाही दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका बारमध्ये मोहित कंबोज यांनी दारू पिऊन राडा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ऑस्कर जिंकणाऱ्या ए. आर. रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी वेळ संपल्यामुळे अर्ध्यावर थांबवला, पण दुसरीकडे मुंबई भाजपचा नेता बारमध्ये रात्री ३.३० वाजेपर्यंत नाचत होता. देवेंद्र फडणवीस कायदा सगळ्यांसाठी सारखा नाही का? कायद्यापेक्षा तुमचे नेते मोठे आहेत का?असा प्रश्न संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.