उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कडाडून टीका केली.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ (Vajramooth Sabha) सभा सोमवार १ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे संपन्न झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कडाडून टीका केली. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्र दिनानिमित्त कळवा येथे आयोजित ‘मराठी बाणा’ कार्यक्रमात बोलत होते.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
महाराष्ट्रातील जनतेला आरोप-प्रत्यारोप, खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. त्यामुळे ही पोटदुखी सुरू झाली आहे. ही पोटदुखी वाढणार आहे म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखानाही तयार करून ठेवला आहे. त्यांनी तिकडे जाऊन मोफत औषध घ्यावं. तसेच बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडली आहेत. सकाळी एकाला मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पडतं, दुपारी एकाला पडतं आणि संध्याकाळीही पडतात. ते उबाठावाले आहेत त्यांना काय बोलायचं हे सुचतच नाही. त्यांना स्वप्न पाहत राहू दे. शेवटी आमदार असो की मुख्यमंत्री, कुणाला बसवायचं आणि कुणाला उतरवायचं हे सर्व जनता जनार्दनाच्या हातात असतं,” अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.