⏩रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नागरिकांन बरोबर संवाद साधणारा सलग 100 वा मन की बात आज सकाळी 11 वाजता साध्य केला. लोकशाही राष्ट्रात सलग 100 वेळा संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधानानी करणे ही ऐतिहासिक घटना आहे.पंतप्रधानान च्या मनात जनतेप्रति असलेली दृढ बाध्यता दर्शक हे सातत्य आहे.
100 वा मन की बात कार्यक्रमाचं औचित्य साधत आज भजपा ने देशभर सामूहिक पद्धतीने शक्तिकेंद्र , बुथ केंद्रावर मन की बात आयोजित केला होता. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात 5 मंडलात76 शक्ती केंद्रात मिळून 110ठिकाणी 3000 कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी जी यांचे संबोधन ऐकले . बूथ सशक्तीकरण कार्यक्रमातील महत्वाचा टप्पा मन की बात कार्यक्रमाचं आयोजन हा होता. त्यानुसार 163 शक्तिकेंद्रां पैकी 76 केंद्रात110 बूथ वर आजचा कार्यक्रम आयोजित केला होता.भाजपा चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख ,बूथ समिती सदस्य, स्थानिक नागरिक यांचा सहभाग लक्षणीय ठेवत आजचा औचित्य पूर्ण मन की बात कार्यक्रम आयोजित करून रत्नागिरी दक्षिण भाजपा ने आपली संघटनात्मक ताकद अजमावली अस म्हणता येईल.
मन की बात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना नंतर बूथ सशक्ती करणं उपक्रम अधिक जोमाने पुढे जाईल आज अखेर सरल अँप माध्यमातून 605 कार्यकर्त्यांनी नोंदणी केली असून नवं तंत्रज्ञानाना माध्यमातून सर्वदूर प्रभावी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे.आज रत्नागिरी शहर मंडल , तसेच धामणसे, निवळी, रीळ या ग्रामपंचयायती, करबुडे, गावखडी येथील कार्यक्रम लक्षणीय ठरल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.