कोकण हे लाईफ सेंटर आहे. इथे मिळणारा ऑक्सिजन हा १०० टक्के शुद्ध आहे
बदलापूर (प्रतिनिधी) बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाला 70 टक्के जनतेचा पाठींबा असल्याचा दावा सरकार करीत आहे.मग आंदोलनकर्त्यांना लाठीमार का केला? मी मुख्यमंत्र्यांना इतकंच सांगतो की,कोकणची वाट लावू नका,अश्या शब्दात वंचित आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले आहे.
बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या महाधम्म मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टिका केली.ते म्हणाले,देशातील अर्धे मंत्री हे अर्धशिक्षीत आहेत असे मी मानतो.कारण शिक्षित असते तर कोकणात रिफायनरी प्रकल्प आणलाच नसता.रिफायनरी प्रकल्पाविरोधात बारसू अजूनही धुमसत असून राज्य सरकारचे पोलीस मात्र आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करीत आहेत.ही दडपशाही फार काळ टिकणार नाही.सरकारला याचा जाब द्यावाच लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले.
बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही आमचा विरोध होता. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका. बारसूबद्दलच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल आंबेडकर म्हणाले की, राज्यातले नेते केंद्रातून फोन आल्यावर त्यांच्या भूमिका बदलतात. नंतर म्हणतात ही भूमिका आमची नाही. आंबेडकर म्हणाले, मुळात कोकण हे लाईफ सेंटर आहे. इथे मिळणारा ऑक्सिजन हा १०० टक्के शुद्ध आहे.