
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अभिजीत बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या संयुक्त बैठकीमध्ये दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनच्या वतिने दिव्यांगांच्या प्रश्नाला, समस्याला न्याय देण्याचा न्याय देण्याचा प्रशासनाकडे मागणी निवेदन व चर्चा….

ठाणे : माननीय आयुक्त अभिजीत बांगर साहेब ठाणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज विकास उपायुक्त माननीय दिक्षित मॅडम व इतर सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध प्रश्नावरती व समस्या वरती दिव्यांगांची संयुक्त बैठक ठामपा मध्ये आयोजित केली होती. त्यामध्ये विविध संघटनेचेे व संस्थांनी भाग घेतला ,त्यामध्ये दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. भरत जाधव सर व माननीय संतोष मोरे रा.उपाध्यक्ष यांनी बैठकीत सहभाग नोंदवला. त्यामध्ये दिव्यांग राईट फेडरेशनच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन 2022 23 यामध्ये मार्च एंडिंग च्या दिव्यांगांना वैयक्तिक लाभ मध्ये अनुदान 24000 त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला पाहिजे., असा दिव्यांग कायदा आहे. त्याचा वापर करा गरीब दिव्यांगांना न्याय द्या अशी मागणी केली तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक कस्टर व बी.यु सी पी तसेच पंतप्रधान आवास योजना व इतर इतर बिल्डिंग विकास व कामे चालू आहे तर दिव्यांग कायद्याप्रमाणे गाळे व घरे दिव्यांगासाठी पाच टक्के राखीव ठेवावी अशी मागणी केली. तसेच सरकारी सेवेमध्ये दिव्यांगांचे पाच टक्के नोकरी सरळ भरतीने स्पेशल करावी व स्वयंरोजगारासाठी स्टॉल फॉर्म काढावे दिव्यांगांना त्याच्यात दिव्यांगांना तक्रारीमध्ये लवकर न्याय द्यावा .दिव्यांग कायदा व दिरगाई कायदा त्याचा अवलंब करावा आणि महानगरपालिकेच्या संयुक्त बैठक वर्षातून चार वेळा घ्याव्या व विविध समितीमध्ये सदस्यत्व तसेच स्वीकृत नगरसेवक ,नगरसेवक यांचे पाच टक्के राखीव ठेवावे . दिव्यांग निधी,इतर सामुहिक व वैयक्तिक खर्च करतांना दिव्यांग समिती ठामपात निर्माण करावी,अशी मागणी दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन च्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिव्यांगांच्या संयुक्त बैठकीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे लेखी व तोंडी मीटिंगमध्ये प्रा. भरत जाधव सर राष्ट्रीय अध्यक्ष दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन यांच्यावतीने करण्यात आली. त्यावर कारवाई होईल व दिव्यांना न्याय मिळेल.ह्या मागण्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्या.
जाहिरात
