दिवा (प्रतिनिधी) सध्या एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका सुरु असून गर्मीचा त्रास मानवालाच नाही तर सभोवतालच्या प्राणीमात्रांनाही होतो.या उद्देश लक्षात घेवून युनिव्हर्सल ह्युमन राईट कौन्सिल आणि आरंभ फाऊंडेशनच्या सुवर्णाताई कदम यांच्यावतीने दिव्यातील भटके कुत्रे आणि पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी दिव्यात जागोजागी पाँट्स ठेवून मानवतेचा संदेश दिला आहे.
दिव्यात प्राणी,पक्षी फिरत असतात.उन्हाच्या कडाक्यात तेही तहाननेने व्याकुल होऊ शकतात.पाणी सहज उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा उन्हामुळे मृत्युही होऊ शकतो.त्यामुळे अश्या सजीवांना सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिवा येथे युनिव्हर्सल ह्युमन राईस कौन्सिल महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुवर्णताई कदम यांनी दिव्यात ठिकठिकाणी पाण्यानी भरलेली भांडी ठेवली आहेत. या कार्यक्रमास दिवा पोलीस स्टेशनचे महाराष्ट्र पोलीस रवींद्र देसले आणि कांबळे साहेब उपस्थित होते
त्याचबरोबर भाजपा पक्षाचे दमदार आणि युवा नेतृत्व श्री रोशन दादा भगत( भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष )यांनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य करून या कार्यक्रमास स्वता सहभागी झाले होते. तसेच लोकांमध्येही त्यांनी जनजागृती केली. त्याबद्दल त्यांचे युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमास आरंभ सोशल फाउंडेशनच्या ज्योतीमाला अभिवंत, नम्रता शेलार, निर्मला मादगुडे, अमिता गौतम, रेशमा माधगुडे, मालती विभूते ,रंजना गुप्ता ,राणी गुप्ता , सोनम गुप्ता, विद्या चव्हाण, कविता गायकवाड ,गुंजा गुप्ता, ज्योती पाटील, रेणुका पाटील ,सिद्धी तांबे आणि अथर्व पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते.