प्रशासकीय यंत्रणेच्या उचित कार्यवाहीमुळे आजचे उपोषण तूर्तास स्थगित.
संघटनेच्या वतीने संघटना कार्यकर्त्यांनी माजी खासदार श्री.निलेश राणे यांचे मानले आभार.
▪️ ग्रामपंचायत मुचरीमध्ये माजी सरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून झालेले आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणून सदर तक्रारी पत्र आणि निवेदनांच्या स्वरुपात पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. असे करून प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे. अशी तक्रार देवरुख येथे मा. खासदार निलेश राणे यांचेकडे मुचरी युवा सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. सोबतच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शवली.
▪️ श्री. निलेश राणे यांनी विषयाचे गांभीर्य समजून घेत संबंधित प्रकरणाची दखल घेतली इतकेच नाही तर श्री.राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुचरी युवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपा युवा मोर्चा (रत्नागिरी द.) जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम व भाजपा संगमेश्वर सोशल मिडिया अध्यक्ष अमोल गायकर यांना संगमेश्वर गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली.
▪️ “आज २६ जानेवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांचा बदललेला पवित्रा पाहायला मिळाला. त्यांनी दिलेल्या विनंती पत्रावरून आता आम्हाला न्याय मिळणार याची खात्री पटली आहे,हे स्पष्ट होते.” अशी माहिती युवा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
▪️ गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या बाबी:
ग्रामपंचायत मुचरी, ता. संगमेश्वर येथील गैरव्यवहाराबाबत मुचरी युवा सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी दिलेली निवेदने व याबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही या अनुषंगाने आज दि. २६ जानेवारी २०२३ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संगमेश्वर (देवरुख) यांचे दालनात संबंधित तक्रारदारांशी चर्चा करण्यात आली. याद्वारे पुढील मुद्द्यांवर कार्यवाही करणे अभिप्रेत आहे.
१. सदर गैरव्यवहार/आर्थिक अनियमिततेच्या अनुषंगाने या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायत मुचरीचे संबंधित ग्रामसेवक यांचेवर जबाबदारी निश्चित करून त्या अनुषंगाने त्यांची एक वेतनवाढ स्थगित करून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तशी नोंद संबंधितांच्या सेवापुस्तकात तात्काळ घेण्यात आलेली आहे. मुचरी युवा सामाजिक संघटना यांच्या म्हणण्यानुसार सदर शिक्षा सौम्य स्वरुपाची असून जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांवर सदर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने अनुज्ञेय असणारी गंभीर/कठोर शिक्षा करण्यात यावी सदर मागणीसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजीची वेळ सुनिश्चित करून दिली आहे.
२. याचबरोबर सदर अनियमिततेबाबत तत्कालीन सरपंच हेही समान रूपाने जबाबदार असून त्याअनुषंगाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून संबंधित तक्रारदार आग्रही आहेत. संबंधित तत्कालीन सरपंच ग्रामपंचायत मुचरी यांचेवरही सदर अनियमिततेच्या अनुषंगाने अनुज्ञेय प्रशासकीय कारवाई करणेबाबत या कार्यालयाकडून शिफारस करण्यात येत आहे.
▪️ “अशाप्रकारे पत्रातील मजकूर असल्याने सदर गैरव्यवहार प्रकरणी आमचा लढा लवकरच यशस्वी होणार हे स्पष्ट झाले आहे. यासाठी आम्ही श्री. निलेश राणे साहेब, श्री. रूपेशजी कदम व श्री.अमोलजी गायकर या लढयात साथ दिल्याबद्दल यांचे आभारी आहोत.” असे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्री.विनोद मिरगल, श्री. बाळा महाडिक,श्री. विलास सुर्वे , महाडिक, टोपरे, भालेकर, नागळेकर इत्यादी अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सामिल होते.