29 एप्रिल/मोहाली- आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
लखनऊने २० षटकांत २५७ धावा केल्या. त्यामुळे पंजाब किंग्जला विजयासाठी २५८ आव्हान देण्यात आले होते पंजाबला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे या सामन्यात लखनऊने पंजाबवर विजय मिळविला.