29 एप्रिल/रत्नागिरी- येथील शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा एप्रिल २०२३ चा सामुहिक वाढदिवस कार्यक्रम उद्या रविवारी (दि.३० एप्रिल) रोजी सायंकाळी ४.३० वाजता संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ राजशेखर मलुष्टे यांचे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा लाभ शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.