⏩ राजापूर ,28 एप्रिल-
राजापूर तालुक्यातील बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी बाबत तणाव पाहायला मिळत आहे. पोलिस घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भर उन्हात आंदोलक आंदोलन करत आहेत.
आंदोलकांना पाठिंबा देताना खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सुधीर मोरे, विलास चाळके, चंद्रप्रकाश नकाशे, विद्याधर पेडणेकर, रामचंद्र सरवणकर., कमलाकर कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.