रिफायनरी रद्द नव्हे तर कोकणा मधून हद्दपार झालीच पाहिजे – मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

Spread the love

मुंबई : रिफायनरीसारख्या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनता मोठ्या संख्येने एकत्रित येऊन प्रकल्पविरोधी आक्रोशीत आहेत. हा  फक्तच विरोध नसून स्वतःचं स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी हाती घेतलेली अहिंसात्मक चळवळ आहे.  मुचकुंदी परीसर विकास संघ लांजा – राजापूर अशा स्थानिक भूमिपुत्रांच्या बरोबर आहे. हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून येथील स्थानिक विरोध दर्शवत असतानाही राजकीय पक्षाचे काही निवडक पदाधिकारी (पुढारी / नेते) मूग मिटून गप्प बसलेले दिसून येतात. का राजकीय दबाव आणून जनतेवर दडपशाहीने करभार करणार का? हा सतंप्त सवाल संस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री सुभाष तांबे यांनी केला आहे.

लोकशाहीत आता गुलामगिरीची वागणूक देऊन जनतेची पार पिळवणुक होतेय हे अद्याप खपवून घेतले जाणारे नाही. ज्यांना हा प्रकल्प हवा आहे, अश्या दलालांच्या मदतीने सरकार हा प्रकल्प करू पाहत आहे. जर हे सरकार गोरगरीब जनतेचे आहे, तर कुणाच्या सांगण्यावरून पोलीस अधिकारी लोकांवर लाठीचार्ज करून गोरगरीब जनतेला घाबरवण्याचा, त्यांना त्रास देणाचा प्रयत्न करीत आहे हे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट करायला हवे.    

स्वर्गासारख्या कोकणाला  संतांची भूमी म्हणुन ओळखली जाते . त्याच कोकणात काही नरकासुर उदयास यावेत हे कोकणवासीयांचे दुर्भाग्य आहे . प्रकल्पाला विरोध करणार्‍या पत्रकार वारीशेची हत्या केली जाते.  कृत्य करणारे  साथीदार कोण?  पुढे सदर घटनेची चौकशी थांबली जाते. त्याशिवाय पत्रकारांना आंदोलनाच्या ठिकाणाहून हुसकावून लावण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. म्हणजे या लोकशाही राज्यात हुकूमशाही ठोठावते आहे असेच म्हणावे लागेल. राजकीय सत्तेचा माज अणि सोबतीला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन जी दंडुकेशाही चालली आहे त्या दंडुकेशाहीला  नागरिकांनी निर्भीडपणे सामोरे जायला हवे. हे राज्य कोणा हुकूमशहाने चालवावे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.  

कोकणातील जनता शांत दिसली तरी सुज्ञ आहे. याच्या पुढेही अशी अनेक संकटे येतील त्यामुळे जनतेने राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासन बळी न पडता संघटीत पणे अरे ला कारे करण्याची तयारी ठेवायला हवी. म्हणजे यांची मग्रुरगिरी वाढणार नाही. प्रस्तावित रिफायनरीचा प्रकल्प सुरुवातीला नाणार आणि आता बारसू , बारसू नाही तर अजून कुठेतरी.  पण तो कोकणातच रुजवायचा अशी भूमिका या सरकारची आहे. जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात असतील त्यामुळे सर्व कोकणकर बंधू भगिनींना विनंती आहे कि आपण कोकणचे भूमिपुत्र म्हणून एक असायला हवे. हा लढा एका प्रातांचा नसून तो आपल्या कोकणचा आहे. म्हणून सर्वानी एकजूटपणे आंदोलकांच्या पाठीशी उभे राहणे त्यांना साथ देणे महत्वाचे आहे.  दरम्यान अजूनही कुठे जमीनी जास्त प्रमाणात विकल्या गेल्या आहेत याची माहिती पत्रकार किंवा समाजसेवकांनी प्रसारीत करावी जेणे करून त्या विभागातील जनता दक्ष राहतील.  या विनाशकारी प्रकल्पा व्यतिरिक्त ,MIDC ,लागु उद्योग ,आंबा काजू वर प्रकिया करणारे प्रकल्प , शेतीविषयक आधुनिक धोरणे ही कोकणाला वर्धान  ठरतील .कोकणाच्या पर्यावरणाचा विचार करून उद्योग धंदे व्हायला हवेत . अशा विनाशकारी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी संघटित व्हायला पाहिजे. आमच्या माता-भगिनी आणि भूमिपुत्रांच्यावर झालेल्या लाठीचार्ज सारख्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे MPVS ने म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page