🔹पोखरण वरचीवाडी मोरी बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून ८ लक्ष निधी मंजूर.
▶️ मालवण/प्रतिनिधी:- भाजपा नेते निलेश राणे काही दिवसांपूर्वी कुडाळ दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन करण्याकरीता पोखरण येथे भेट दिली होती. यावेळी पोखरण येथे महापुरुष वरचीवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावरील खचलेल्या मोरीची पहाणी निलेश राणे यांनी यावेळी केली होती.
▶️किमान ३५० लोकवस्तीच्या या भागाचा मोरी खचल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटणार होता त्यावर पोखरण ग्रामस्थांनी तातडीने या मोरी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यानुसार तातडीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देत निलेश राणे यांनी पोखरण ग्रामस्थांची समस्या मार्गी लावली आहे.