
▶️ मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेतली.
या वेळी शरद पवार यांनी संघटनात्मक कामासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच साहिल आरेकर यांची वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. साहिल आरेकर यांचे आजोबा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच माजी खासदार स्व. गोविंदराव निकम, गुहागरचे माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांची देखील आठवण साहेबांनी काढली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक श्री. बबन कनावजे उपस्थित होते. त्यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा आढावा देखील दिला.