▶️ नवी दिल्ली ,26 एप्रिल-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या मानहानीच्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती गुजरात उच्च न्यायालयात केली आहे. त्यांचे वकील किरीट पानवाला यांनी माध्यमांना सांगितले की, सुरत न्यायालयाने त्यांची अपील फेटाळल्यानंतर त्यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
२० एप्रिल रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यासंबंधीची त्यांचे अपील फेटाळले होते. २३ मार्च रोजी, मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि २०१९ मध्ये कर्नाटकमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान ‘मोदी आडनावा’ संदर्भात केलेल्या विधानावरून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर लगेचच त्यांना अपात्र ठरवून संसदेच्या सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले होते.