दिवा (प्रतिनिधी ) जवळपास साडेतीन लाखपेक्षा जास्त वास्तव करीत असलेल्या दिव्यात तातडीचा आणि अत्यंत आवश्यक असलेला आरोग्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.यासाठी येथील माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांनी सुरु होत असलेल्या मातोश्री नगर येथील जागेची पाहणी केली असून या जागेवर सध्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या बाबीं तपासल्या आहेत.दरम्यान दिव्यातील प्रशस्त 13 एकर जागेवर होऊ घातलेला रुग्णालय आगासन येथे होईपर्यंत येथे भाडेतत्वावर जागा घेवून लोकांना सेवा देण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार असल्याची माहीती माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांनी दिली आहे.
दिव्यातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी शहरापासून साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही दळणवळणाची सुविधा नाही.त्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र दिवेकरांसाठी असूनही ते नसल्यासारखेच आहे.दिवेकर नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र असावे यासाठी नागरिकांची मागणी होती.परंतु येथील जागा या सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्यामुळे आरोग्य केंद्र उभारणे शक्य होत नव्हते.त्यामुळे गेल्या दिड ते दोन वर्षापासून येथील ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी हे जागेच्या शोधात होते.जागा शहरापासून जवळच असावी यासाठी त्यांची अपेक्षा होती.
दरम्यान दिव्यातील मातोश्री नगर येथे लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा मिळतील अशी जागा भाडेतत्वावर मिळाली आहे.याच जागेवर हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होणार असून तेथील खोल्यांचे रंगरंगोटी आणि सुरक्षित बाबींची तपासणी सुरु आहे.याठिकाणी लवकर ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी नर्सेस,डाँक्टर आदी आपल्या सुविधांसह सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत उपलब्ध असणार आहेत.हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असल्यामुळे आगासन,शिळ,साबेगांव,दातिवली,गणेशनगर व इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांसाठी सोयीस्कर होणार आहे.