
रत्नागिरी ,25 एप्रिल एन. आय. आय. टी. मुंबई ही आयसीआयसीआय बँकेची अधिकृत रिक्रूटमेंट पार्टनर एजन्सी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गाइडन्स आणि प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅपस इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता २७ एप्रिलला या मुलाखती होणार आहेत.
आय.सी.आय.सी.आय. बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर या पदांकरिता मुलाखती होणार आहेत. महाविद्यालयातून २०२१, २०२२ व २०२३ या वर्षामध्ये पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले कोणत्याही विद्या शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये सहाव्या सत्राची परीक्षा देणारे विद्यार्थी या मुलाखतीकरिता सहभागी होऊ शकतात. या मुलाखती डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता सुरू होतील.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सोबत बायोडेटा, मूळ गुणपत्रे, फोटो, आधारकार्ड कागदपत्रे आणावीत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. तसेच याविषयी अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.