चिपळूण ,25 एप्रिल-/चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयात आज मंगळवारी (ता. २५) दिव्यांग दाखला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांगांना, पेन्शन, दिव्यांग पाच टक्के निधी लाभ, लाभार्थी कुटुंब रेशनकार्ड, अंत्योदय रेशनकार्ड, एसटी, रेल्वे प्रवासात सवलत असे विविध लाभ मिळवण्यासाठी, केंद्र शासनाचा दिव्यांग दाखला, युडीआयडी असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील बहुतांश दिव्यांगांनी हा दाखला जिल्हा रुग्णालयातून प्राप्त करून घेतला आहे. तरीही कुणी दिव्यांग या दाखल्यापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा रुग्णालयाने कामथे रुग्णालयात दिव्यांग दाखल्यासाठी आवश्यक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. चिपळूण व लगतच्या तालुक्यातील दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भुस्कुटे यांनी केले आहे.