👉 मसाले, पीठे, बेगमीचे पदार्थ आणि आंबेसुद्धा मिळणार
रत्नागिरी- गेली सतरा वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींना प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे ३० एप्रिलपासून मान्सूनपूर्व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये मसाले, पीठे, बेगमीचे पदार्थ आणि आंबेसुद्धा मिळणार आहेत.
जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होणार आहे. गेली अनेक वर्षे महिला दिन, खास दिवाळी खरेदीसाठी प्रदर्शने भरवणाऱ्या ग्राहक पेठेने लोकाग्रहास्तव मान्सूनपूर्व प्रदर्शन आयोजित केले आहे. गेली अनेक वर्षे महिला बचत गटांचे संघटन, एकत्रिकरण आणि महिला उद्योगिनींना सर्वतोपरी मदत करणाऱ्या प्राचीताई शिंदे यांनी प्रदर्शन व विक्रीकरिता स्टॉल्सचे नियोजन केले आहे.
या प्रदर्शनात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये वेशभूषा स्पर्धा, सांस्कृतिक, मार्गदर्शन, प्रशिक्षण, फनिगेम आदीसुद्धा रंगणार आहेत. अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी 9422376224 किंवा 9764417079 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.