संगमेश्वर ,22 एप्रिल-
देवरूखला हिंदी सस्पेंस थ्रिलिंग वेबसीरिजची निर्मिती होणार असून त्याचा प्रारंभ आज (ता. २२) अक्षय्य तृतीयेला देवरूखात होणार असल्याची माहिती अभिनेते, दिग्दर्शक असित रेडीज यांनी दिली. देवरूख व रत्नागिरी जिल्ह्यात चांगले कलाकार, तंत्रज्ञ, चांगला निसर्ग असे वरदान आहे. स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल म्हणून देवरूखसह जिल्ह्यातील कलाकार व लोकेशन या हिंदी वेबसीरिजसाठी निवडणार आहे, असे रेडीज यांनी सांगितले.
सध्या माखजन पट्ट्यात अवधूत चिंतनचे शूटिंग सुरू असून रेडीज हे ज्ञानेश्वर माऊलीमध्ये जोशी शास्त्रींची भूमिका साकारत आहेत. हिंदी वेबसीरिजची निर्मिती देवरूखमध्ये होणार असून यासाठी प्रत्येक विभागासाठी नागरिकांची, कलाकारांची मदत लागणार आहे. या सर्वांना आर्थिक मदतही होणार आहे. तरी यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा, असेही रेडीज यांनी सांगितले. या नव्या हिंदी वेबसीरिजमुळे स्थानिकांना जास्त संधी दिली जाणार आहे.