पंजाब नॅशनल बँकेने एक ट्विट करून ग्राहकांना बँकेच्या नावाने पसरवल्या जाणार्‍या खोट्या मॅसेजविरोधात सतर्क केले आहे. या संदर्भात बँकेने एक सूचना जारी केली आहे

Spread the love

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना संभाव्य फसवणुकीबद्दल सावध केले आहे आणि त्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका ट्विटद्वारे या संदर्भात एक एडव्हायजरी जारी केली. या ट्विटमध्ये, बँकेने ग्राहकांना बँकेच्या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सर्कुलेट केल्या जाणार्‍या फ्रॉड मॅसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की, या मेसेजमध्ये ‘PNB च्या 130 व्या वर्धापनदिनानिमित्त सरकारची आर्थिक सबसिडी ऑफर करत आहे’ असे लिहिले आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा मॅसेज झपाट्याने पसरवला जातोय.

पीएनबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा फ्रॉड मॅसेज आहे, जो फसवणूक करण्यासाठी बँकेच्या ब्रँड नावाने पसरवला जातोय. काही प्रकरणांमध्ये, हे फसवणूक करणारे ओळख चोरण्यासाठी किंवा आर्थिक घोटाळा करण्यासाठी अशा प्रकारचे डावपेच आखत आहेत.

पीएनबीने सर्वसामान्यांनी याबाबत सावध राहण्याचे आणि अशा मॅसेजला गांभीर्याने न घेण्याचे आवाहन केलेय. विशेषत: व्हॉट्सअॅपसारख्या डिजिटल माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अशा संदेशांकडे लक्ष देऊ नका, असंही सांगण्यात आलंय.

या सरकारी बँकेने म्हटले आहे की, ‘फोन कॉल किंवा ई-मेलद्वारे कोणत्याही प्रकारची खाजगी/वैयक्तिक/आर्थिक माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. यासोबतच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. कोणत्याली संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका आणि त्यावरुन काही डाउनलोड करण्याचाही प्रयत्न करु नका.’

RBI नेही दिला होता इशारा

यापूर्वीही, बँकिंग सिस्टममधील फसवणुकीच्या वाढत्या संख्येबद्दल आणि त्यामुळे प्रभावित लोक आणि ग्राहकांबद्दल चिंता व्यक्त करताना, केंद्रीय बँक म्हणजेच RBI ने संबंधितांना एकत्रितपणे योग्य पावले उचलण्यास सांगितले होते. यासाठी आरबीआय ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवते.

ऑक्टोबर 2015 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अशा ऑनलाइन फसवणुकीचे हल्ले टाळण्यासाठी पब्लिक अॅडव्हायजरी जारी करून आवाहन केले होते. मार्च 2022 मध्येही, आरबीआयने एसएमएस, ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, फोन कॉल आणि ओटीपीद्वारे फसवणूक टाळण्यासाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती. या सर्व इशाऱ्यांनंतरही अनेक लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. जास्तीत जास्त लोक डिजिटल बँकिंग माध्यमांचा अवलंब करत असल्याने अशा फसवणुकीचा धोकाही वाढत आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page