संगमेश्वर पोलीस ठाणे येथे इफ्तार पार्टी उत्साहात…..

Spread the love

सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयन्त करावा :- पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख

 संगमेश्वर/ वार्ताहर :- 

    संगमेश्वर परिसरातील मुस्लिम बांधवांच्या त्यांच्या पवित्र रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले, यावेळी मुस्लीम जमातीतील अध्यक्ष, पदाधीकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार  घेतला होता.

   जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, अप्पर अधीक्षक जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस निरीक्षक श्री प्रविण देशमुख व कर्मचारी वर्गा मार्फत या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते.

गेल्या दोन वर्षा पुर्वी  कोरोना महामारी मुळे सर्व सार्वजनीक उत्सव व  कार्यक्रमावर प्रतिबंध होते,परंतु यावेळी सर्वानी हिरीरीने भाग घेतला.

याप्रसंगी पो.नि.देशमुख साहेब यांनी रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपापली जबाबदारी, सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्वानी दक्षता घेणे गरजेचे आहे, तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून सर्वानी सहकार्य करावे असे आव्हान करून सर्व समाजातील मंडळीनी एकमेकांच्या सणात आनंदाने सहभागी होऊन एकोप्या चे दर्शन घडवावे ,असे प्रेमळ सूतोवाच केले.
           गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागातून सेवा बजावून संगमेश्वर सारख्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या संगमेश्वर पोलीस ठाणे येथे पो.नि.प्रविण देशमुख यांनी पदभार स्विकारला व एक कर्तव्यदक्ष अधिकारी संगमेश्वर ला मिळाला असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
           यावेळी संगमेश्वर तालुक्यातील मुस्लीम ट्रस्टचे पदाधिकारी तसेच विविध गावातील जमातीचे अध्यक्ष, सरपंच, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते,

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page