⏩राजापूर-
गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात असणारी मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने राजापूर तालुका क्रीडा संकुलानाचे प्रथम टप्प्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष तथा आमदार राजन साळवी यांनी अधिवेशना दरम्यान राजापूर तालुका क्रीडा संकुलना साठी तत्काळ रु.५०लाख निधी उपलब्ध केला.
सदर संकुलांनासाठी सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ,पाचल,राजापूर या संस्थेने रायपाटण येथील ३.८० हे जागा सामंजस्य कराराने उपलब्ध करून दिली असून सदर जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी सादर करण्या आलेल्या अंदाजपत्रक व आराख्याड्याना सुधारित रु.५०० लाख प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु पहिल्या टप्प्यातील रुपये १००लक्ष निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया झाली असता सदर मंजूर झालेला निधी हा अपुरा पडत असल्याचे निदर्शनास आले असता मा.जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अतिरिक्त निधी मिळणेसाठी शासनस्तरावर प्रस्ताव सदर करून आमदार डॉ.राजन साळवी यांच्या सदर बाब निदर्शनास आणली. आमदार डॉ.राजन साळवी यांनी तत्काळ दखल घेत अधिवेशन दरम्यान सदर प्रस्ताव मंजूर करून घेतला असून त्यामुळे सदर क्रीडा संकुलनासाठी तत्काळ रु.५० लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे.
तसेच दिनांक ०६/०३/२०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल समिती राजापूरची सभा घेऊन तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ.राजन साळवी यांनी तालुका क्रीडा संकुलानासाठी उर्वरित क्रीडा सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडे उर्वरित रु.३५० लक्ष निधी मागणी करावी असे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांना दिले आहेत. संकुल उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीपथावर सुरू झाली असल्यामुळे तालुक्यातील खेळाडूंची क्रीडा संकुलाची मागणी पूर्णत्वाला लवकरच जाणार असून समाधान व्यक्त केले जात आहे.