⏩️लांजा,21 एप्रिल- कोल्हापूरकडे जाणारा भला मोठा कंटेनर रस्ता चुकल्याने लांजा कोर्ले साखरपा मार्गावर शहरातील कुंभारवाडी नजीक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने या मार्गावर वाहतूक एक तास खंडित झाली होती. ही घटना गुरुवारी २० एप्रिल रोजी घडली.
आर जे २५ जीए ३५४५ या क्रमांकाचा भला मोठा कंटेनर हा कोल्हापूरकडे जात होता. मात्र ड्रायव्हर रस्ता चुकल्याने हा कंटेनर लांजा शहरातून लांजा कोर्ले साखरपा मार्गे कोल्हापूरच्या दिशेने चालला होता. या रस्त्याचा त्याला अंदाज नसल्याने सदर कंटेनर हा अचानकपणे लांजा शहरात लांजा कोर्ले मार्गावर कुंभारवाडी नजीक अडकून पडला. रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर अडकून पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी हा कंटेनर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर हा कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आणि या मार्गावरील खंडित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
…………………………………….