⏩आयपीएलचा यंदा १६ वा हंगाम सुरु असून प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना दिसत आहे. आयपीएलमध्ये गुरूवारी RCB आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये लढत झाली. यावेळी विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने बंगळुरूला चांगली सुरूवात करून दिली होती परंतु हे दोन स्टार फलंदाज बाद झाल्यावर RCB ला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. खेळ सुरू झाल्यावर RCB सहज २०० पर्यंत धावा करेल असे वाटत असतानाच मिडल ऑर्डर ढासळल्याने RCB ने फक्त १७४ धावा केल्या.
यानंतर सेकंड इनिंगमध्ये मात्र RCB ने बेधडक गोलंदाजी करत आपला डाव सावरला. पंजाब सहज जिंकेल असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीसमोर पंजाब संघ ढासळला. पंजाबची अवस्था ७ बाद १०६ अशी झाली असताना जितेश शर्माने पंजाबकडून चांगली खेळी केली. मात्र मोहम्मद सिराजच्या वादळी माऱ्यासमोर पंजाबचा डाव १५० धावात संपुष्टात आला आणि अखेर RCB ने २४ धावांनी सामना जिंकला.
⏩विराटकडे होते कर्णधारपद
या सामन्यात विराट कोहलीने RCB चे कर्णधारपद भुषवले. तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा विराटकडे RCB चे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आणि फाफ डु प्लेसिसचा वापर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करण्यात आला यावेळी फाफने RCB कडून सर्वाधिक धावा केल्या आणि मोहम्मद सिराज