⏩रत्नागिरी:- राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांनी जिल्हा महिला रुग्णालय येथे रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील कामाचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी उॉ. अनिरुध्द आठल्ये आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत असल्याने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा. महाविद्यालय रंगरंगोटी, मुलांचे वसतीगृह, पदभरती, मुलांचे प्रवेश आदि विषयांवर मंत्री महोदयांनी संबधितांबरोबर चर्चा केली आणि सर्व कामे लवकर लवकर पूर्ण करा.
गाळ काढणे संदर्भात आढावा
पालकमंत्री महोदयांनी खांदाटपाली, ता. चिपळूण, ऊक्षी, ता. संगमेश्वर, चांदेराई, ता. रत्नागिरी, मिरजोळे, ता. रत्नागिरी, अर्जुना गोडी, ता. राजापूर येथे गाळ काढणेची सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या पोंमेडी, पावस आणि मजगाव याचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्ष्ाक अभियंता वैशाली नारकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यंवशी, कार्यकारी अभियंता काझी, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, चिपळूणचे प्रांतधिकारी प्रवीण पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये आदि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.