देवरुख नगरीत भाजपा नारीशक्तीचा मेळावा उत्साहात संपन्न…

Spread the love

महिला आघाडी प्रदेश सचिव सौ. वर्षा भोसले व रत्नागिरी द. जिल्हा समन्वयक सौ. मंजुषा कुद्रीमोदी यांनी महिलांना दिला ‘कानमंत्र’.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | एप्रिल २०, २०२३.

देवरुख येथील श्री लक्ष्मीनृसिंह मंगल कार्यालयात शेकडो महिलांच्या उपस्थितीत ‘नारीशक्तीचा निर्धार मेळावा’ संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भाजपा नवी मुंबईच्या माजी जिल्हाध्यक्षा तथा ‘सेल्फी विथ लाभार्थी प्रकोष्ठ’च्या प्रदेश संयोजक सौ. वर्षाताई भोसले उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत रायगड दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस तथा रत्नागिरी दक्षिण जिल्हा समन्वयक सौ. मंजुषा कुद्रीमोदी उपस्थित होत्या.

या मेळाव्याच्या निमित्ताने देवरुख शहर महिला आघाडी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला. शहराध्यक्षपदी सौ. स्नेहा राहुल फाटक यांची नियुक्ती करण्यात आली. सौ. सुप्रिया शंकर मालप व सौ. समृद्धी संदीप वेलवणकर यांची शहर उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली. शहर संघटन सचिव म्हणुन सौ. श्रद्धा संजय इंदुलकर यांना जबाबदारी देण्यात आली. सौ. प्रतिभा मांडवकर यांना शहर सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले. याव्यतिरिक्त तालुका महिला मोर्चा महामंत्री म्हणुन आंबेड ग्रामपंचायत सदस्या सौ. नुपुरा उन्मेश मुळ्ये यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार यांनी केले. यानंतर महिला आघाडीच्या या भव्य मेळाव्यास तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांनी संबोधित केले. महिलांनी पक्षासाठी द्यायचे योगदान, कार्यकर्ता म्हणुन असलेली कर्तव्ये आणि सामाजिक भान याबाबत सौ. कुद्रीमोदी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक सौ. भोसले यांनी महिलांना ७८२००७८२०० क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सरल नोंदणी करण्याचे आवाहन केले. ‘बूथ सक्षमीकरण आणि त्यात महिलांचे योगदान’ याबाबत माहिती देतानाच त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. सोशल मिडियावर आपल्या कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्याची जाणीव महिलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने काम केल्यास पुरुषांपेक्षा अधिक प्रभावी काम महिलाच करू शकतात हा विश्वास यावेळी व्यक्त करत उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवरुख नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, भाजपा देवरुखचे शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांनी केले. संगमेश्वर महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page