संगमेश्वर :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी पुलावर आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास दोन कारचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. तर मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी गाड्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
सोनवी पूल अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काही दिवसापूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला. मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. आज गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्रीच्या दिशेने जाणारी कार आणि रत्नागिरीहून डेरवणच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस किशोर जोयशी, शेलार, भाऊ मोहिते यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.