खेड :- मुंबई – गोवा महामार्गावर आज दुपारी आपेडे फाटा नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जि प शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल संजय भटकर (३७, रा. शिरवली ता. खेड जि रत्नागिरी मूळ गांव : मुरंबा , ता. मूर्तिजापूर , जि. अकोला ) असे त्या मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील शिरवली येथून स्वप्निल संजय भटकर हे दुचाकी (एमएच ०८ बीबी १०७३ ) ने कळंबणी येथे जात असता आपेडे फाट्यावर मुंबई च्या दिशेने वळत असताना गोव्याच्या दिशेने जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार स्वप्निल भटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर पाठिमागे बसलेले विनोद वसंत जाधव (४२ ) यांना गंभीर दुखापत झाली.