पत्रकार रघुनाथ भागवत यांना साळी जीवनगौरव पुरस्कार ; सर्व स्तरातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर/श्रीराम वैद्य ) जगभरातील साळी जनांची लोकप्रिय व विश्वसनीय सामाजिक संस्था श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा स्व.श्री माधवराव गोविंदराव साळी स्मृती साळी पत्रकार जीवनगौरव पुरस्कार- २०२१ चा पुरस्कार महाड येथील निर्भीड पत्रकार रघुनाथ भागवत यांना रविवारी पुणे येथील विणकर सभागृह येथे ज्येष्ठ कामगार नेते तथा समाजसेवक श्रीकृष्ण फडणवीस (पुणे) यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारी दरम्यान सर्वच कार्यक्रमांना सरकारने बंदी घातली होती, त्यामुळे सदर संस्थेच्या वतीने सन -२०२० ते २०२२ सालातील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.यामध्ये साळी गुरुवर्य जीवन गौरव पुरस्कार,साळी पत्रकार जीवन गौरव पुरस्कार,साळी धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार,सहयोगी संस्थांचे सन्मान,श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान अभिमान गौरव,कार्यकर्ता कृतज्ञता सन्मान आणि विशेष कार्यभूषण सन्मान हे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.यामध्ये संपूर्ण भारत देशातील पुरस्कार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी भव्य दिव्य पुरस्कार सोहळयाला ज्येष्ठ दानशूर समाजबंधू निवृत्ती गायकवाड (सोलापूर), डॉ.बाळासाहेब नेर्लेकर,संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर बारगजे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकारीतेच्या क्षेत्रात ज्ञान,कौशल्य, अनुभव यांच्या आधारे सेवाभावनेने सचोटी आणि परिश्रमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकजागृती,लोकशिक्षण आणि लोकशाहीचे सुदृढीकरण करण्यासाठी गेली २२ वर्षे बहुमोल योगदानाबद्दल दखल घेऊन सदर संस्थेने स्व.श्री माधवराव गोविंदराव साळी स्मृती साळी पत्रकार जीवनगौरव पुरस्कार महाड येथील दैनिक पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार रघुनाथ भागवत यांना जाहीर केल्यानंतर आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर देखील रायगड जिल्हा साळी समाज-मुंबई, पुणे, महाड आदी ठिकाणातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.महाड साळी समाजाच्या वतीने पुरस्कार प्राप्त पत्रकार रघुनाथ भागवत यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी महाड साळी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत बिचकर, सेक्रेटरी वैभव गोंधळी, महाड नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष नितीन पावले, प्रदिप हरवंदे, संतोष शिपूरकर, नवीन साळी, गिरीश साळी, राजेश डोईफोडे, मंगेश साळी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page