⏩मुंबई- उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुढील ४ दिवस मुंबईसह आसपासच्या काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मुंबईकरांना उष्णतेचा तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईत बुधवारी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यानंतर आता पुढील चार दिवस मुंबईकरांना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण मुंबईसह कोकण आणि गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २० तारखेपासून ४ दिवसांसाठी Tmax मध्ये २-४° ने घसरण होणार आहे.
शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील किमान ४ दिवस मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यातील लोकांनी उन्हात घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय पुढील ५ दिवसांत विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये २० तारखेला गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागातून व्यक्त करण्यात आली आहे.