☯️ ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ राजभवन येथे प्रदान
मुंबई ,20 एप्रिल- नोकरी, स्वयंरोजगार व उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केले. या कार्यात कॉर्पोरेट्स व उद्योग संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
☯️राज्यातील वीस हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
आपण मुख्यमंत्री असताना कॉर्पोरेट्सच्या मदतीने राज्यातील एक हजार गावांचे आदर्श गाव म्हणून परिवर्तन केले असल्याचे सांगून आगामी काळात राज्यातील २० हजार गावांचे सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यात कॉर्पोरेट व उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे सांगून सीएसआर अंतर्गत कोणतेही उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी शासन कॉर्पोरेट्स व उद्योग समूहांना निश्चितपणे मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.