⏩मुंबई- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप अशा भ्रष्ट सरकारला पाठिंबा का देत आहे, मुंबई मधील रस्त्यांची कामे आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेली दुर्घटना असे अनेक प्रश्नांबाबत आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
⏩नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या विकासकामांची घोषणा केली होती. मात्र, ही कामे अद्याप सुरू झाली नाहीत. मात्र या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रेती, खडी ज्या कंत्राटदाराकडून घेतली आहेत, त्याने स्वतःचे नियम लादल्यामुळे ही कामे रखडली असून पावसाळ्याआधी ही कामे होतील का याबाबत शंका आहे. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहेत. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे. अशा भाषेत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण सोहळा दरम्यान झालेल्या अपघाताची चौकशी व्हावी. सरकारने मृतांचे खरे आकडे लपवले आहेत. तसेच या सर्व प्रकाराला सरकार आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. २५ कोटी रुपये खर्च करून एवढ्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले मात्र याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले नाही त्यामुळे या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार आहे.,असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली केवळ घोटाळे सुरू आहेत. मुंबई पालिकेत नगरसेवक नसताना देखील पाच मोठे कंत्राट कसे दिले ? शिवाय पावसाळा तोंडावर असतांना कोणतीही कामं सुरू झालेले नाही. म्हणूनच सरकारकडून नागरिकांची केवळ फसवणूक सुरु आहे. अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली आहे.