⏩19 एप्रिल 2023
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात आता 16 एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची 1 वर्षे कंत्राट पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यामधील 7 वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात हजर झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. मात्र तूर्तास विविध मेडिकल कॉलेजकडून रत्नागिरी जिल्ह्यात 16 वैद्यकीय अधिकारी हजर होणार आहेत. यातील दापोली 1, कामथे 1, सिव्हिल हॉस्पिटल 2, रायपाटण 1, देवरूख 1, गुहागर 1 असे एमबीबीएस 7 डॉक्टर हजर झाले असून उर्वरित 9 वैद्यकीय अधिकारी येत्या आठवड्यात हजर होणार आहेत. गेले अनेक वर्षे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. आहे त्या परिस्थितीत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सिव्हील हॉस्पिटलची टीम करत आहे. मेडिकल कॉलेजचे 16 एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांना नियुक्ती पत्र दिल्याने आता एक वर्षे का होईना, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत लवकरच मेडिकल कॉलेजचे स्वप्न साकार झाल्यास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.