मुंबई (शांताराम गुडेकर )
माहिती अधिकार,पोलिस मिञ व पत्रकार संरक्षण सेना,भारतीय महाक्रांती सेना या संघटनेच्यावतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव-२०२३ साजरा करण्यात आला.याप्रसंगी आंतराष्ट्रिय मानवाधिकार संघटना,महिती अधिकार,पोलिस मित्र, पत्रकर संरक्षण सेना,जागतिक शांती सेना आंतराष्ट्रिय/संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक,जागतिक मानवाधिकार ए.एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष,आंतरराष्ट्रीय पत्रकार हक्क पार्लमेंट कमिटी राष्ट्रीय उपाध्यक्ष व AIACPC चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ,श्री अनंत मंगल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष,मानवी हक्क संरक्षण सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी अनाथांची माई वरिष्ठ समाजसेविका सौ.जयश्री माईसाहेब सावर्डेकर,मुंबई अग्निशमन दल विभागीय अग्निशमन अधिकारी मा.श्री.राजेंद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आयोजकांतर्फे सर्व प्रमुख पाहुणे यांचा शाळ, श्रीफळ, पुष्प करंडक देऊन सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक श्री.आकाश कासारे,आंतराष्ट्रिय मानवाधिकार संघटना, महिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकर संरक्षण सेना, जागतिक शांती सेना डॉ.अफसर भाई खुरेशी,राष्ट्रीय अध्यक्ष माहिती अधिकार, पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण सेना श्री.कैलास दादा पठारे,ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अक्षरा फाउंडेशनचे संस्थापक श्री.अमोल वंजारे,जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र पुण्याचे श्री.संतोष माने,नवी मुंबई अध्यक्ष युवक आघाडी श्री.संजय जाधव(आण्णा), माहीती अधिकार, पोलीस मित्र, पत्रिका संरक्षण सेना रसीद पठाण,संघटनेचे मुंबई चिटणीस श्री.हितेश गायकवाड, श्री.किशोर भिलारे , शिवसेना प्रणित (उध्वजी बाळासाहेब ठाकरे) मायेची सावली एकहात कर्तव्याचा संस्थापक, माहीती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ईशान्य मुंबई सहसचिव श्री यशवंत खोपकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.