रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील अनिकेत जाधव या बौद्ध समाजाच्या युवकाला काही तरूणांनी जातीवाचक शिवागाळ करत मारहाण डोक्यात चिरा घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्याच्या गुप्तांगालाही गंभीर दुखापत केली. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सर्व समाज एकत्र आल्यानंतर खूनाचा प्रयत्न
अद्याप गुन्हेगार मोकाट आहेत. येत्या दोन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु इशारा दिवसात या गुन्हेगारांना अटक केली नाही, तर सर्व समाज एकत्र येऊन पोलीस दलाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू, असा इशारा रिपब्लिकन पार्टीचे कोकण संघटक रोहित तांबे यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी वंचित आघाडी, बसपा, रिपाई आदींचे पदाधिकारी अशोक पवार, कृष्णा कदम, चंदन कदम, श्री. कांबळे, संतोष जाधव, राजेंद्र मोहते, आधी जण उपस्थित होते
जाहिरात