
⏩18 एप्रिल 2023
देवरुख- येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संस्था व महाविद्यालय, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी दि.१९ एप्रिल रोजी सकाळी १०:०० ते सायं.५:०० वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या द. ज. कुलकर्णी सेमिनार हॉलमध्ये सर्वंकष मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये डोळ्यांच्या अंतर्गत व बाह्य भागाची तपासणी, इंट्राऑनक्युलर प्रेशर मोजणी, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी, मोतीबिंदू व काचबिंदूचे परीक्षण, चष्म्याचा अचूक नंबर व कॉम्प्युटर वापरामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व स्टाफ तसेच देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य या सर्वांनी या सुविधेचा लाभ कुटुंबीयांसमवेत घेण्याचे आवाहन संसाध्यक्ष सदानंद भागवत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे.