
⏩बंगळूरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर सोमवारी रॉयल चॅलेंजर बॅंगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याचा थरार बघायला मिळणार आहे. बंगळूरच्या संघासमोर चार वेळा आयपीएल विजेता संघ चेन्नईचे आव्हान असणार आहे. तसेच भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू धोनी व कोहली समोरासमोर दिसणार आहेत.
⏩दक्षिणात्य संघ
आयपीएलच्या आजच्या सामन्यात दक्षिणेकडील राज्यांच्या दोन तगड्या संघामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ ३० वेळा आमनेसामने आले असून १९ सामने चेन्नई तर १० सामने बंगळूरने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. २०२२ ला बंगळूरने १३ धावांनी चेन्नईवर विजय मिळवला होता. चेन्नईबरोबरच्या सामन्यांमध्ये विराटने तडाखेबंद खेळी केलेली आहे. त्याने ३० सामन्यात ९७९ धावा ३९.१६ च्या सरासरीने केल्या असून नऊ अर्धशतकचा यात समावेश असून त्याने सर्वाधिक ९० धावसंख्या केली आहे.
⏩विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे, गेल्या सामन्यात त्याने ५० धावा केल्या होत्या. या हंगामात चार सामन्यात त्याने २१४ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे धोनी पण आपल्या जुन्या रंगात आला आहे, त्याच्याबरोबरच जडेजा, गायकवाड सातत्याने संघासाठी महत्तवपूर्ण कामगिरी करत आहेत, त्याचा फायदा चेन्नईला होत आहे. त्यामुळे दोन्ही संघात चुरशीची लढत क्रिकेटप्रेमींना पहायला मिळेल यात शंका नाही.