
रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीच्या
वतीने दिनांक : 31/03/2023 रोजी गोळवशी क्रिकेट मैदानावरती रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट मुलांचा संघ बनविण्यासाठी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये पुढील प्रमाणे मुलांची निवड करण्यात आली. अनिकेत चंद्रकांत गावणकर ,प्रथमेश चंद्रकांत जानसकर ,पीयूष जगदीश पवार ,संचित देऊ मोहिते, रोहन गंगाराम धनावडे ,राहुल दिनेश गावणकर, ऋषिकेश सुनील इंदुलकर, स्वरूप प्रकाश पांचाळ, अनिकेत प्रकाश गुरव, प्रतीक प्रकाश पळसमकर, गणेश सुरेश वीर ,मेघराज मनोहर पेजे, वेदांत संजय निवाते , रोशन रामदास पांचाळ, सुरज रवींद्र आणेराव
हा निवड केलेला संघ टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथे होणाऱ्या पहिल्या 23 वर्षे वयोगटातील टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2023 दिनांक 24 एप्रिल ते 27 एप्रिल 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल नाशिक, पिंपरी सय्यद, नाशिक येथे या टेनिस क्रिकेट स्पर्धेला जाणार आहे. अशी माहिती रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव सर, सुमित आनेराव सर, रोशन किरडवकर सर, रणजीत पवार सर यांनी दिली आहे.
तसेच मधुकर जी जाधव साहेब, माझे कोकण यूट्यूब चैनल चे पत्रकार राहुल वर्दे सर, सुरेश भालेकर, महादेव खानविलकर, अशोक गुरव, वनगुळे गावचे सरपंच प्रभाकर जी गुरव, गणेश खानविलकर, महेश वीर, प्रणव खानविलकर, अजय मोर्ये यांनी निवड झालेल्या मुलांचे अभिनंदन केले आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.