मुंबई : “स्वराज्य फाऊंडेशन” चे संस्थापक अध्यक्ष उदय अशोक पवार आणि सहकार्यांतर्फे दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त थंड पेय आणि जल वाटप अभ्युदय नगर येथील चौकात बाबासाहेबांच्या अनुयायांना तसेच विभागातील नागरिकांना करण्यात आले.
पंचशील सेवा संघाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व मानवंदना देण्यासाठी हजारोच्या संख्येने अभ्युदय नगर परिसरातून जनसमुदायाची लाट उसळली होती.
उन्हाचा तडाखा असूनही मोठ्ठया संख्येने लहान थोर, महिला भगिनी, युवक बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत होते. त्यानिमित्ताने स्वराज्य फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने थंड पेय व जलाचे वाटप करण्यात आले
“स्वराज्य फाऊंडेशन” २००८ सालापासून मुंबई शहरात कार्यरत आहे. तसेच समाजकार्य हीच खरी मानवंदना या भावनेतून अभ्युदय नगर येथील युवा उद्योजक उदय अशोक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भीम सैनिक, महिला, लहानग्यांना थंड पेय व जलाचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
सदर कार्यक्रमासाठी शिवसेना मा. नगरसेवक दत्ताराम पोंगडे, शिवसेना शाखा क्र. २०५चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले तसेच पदाधिकारी, पीएसआय शेख साहेब, चव्हाण साहेब, अभ्युदय नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे जिवाजी परब तसेच पदाधिकारी, जिजामाता नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सोनू भालेकर तसेच पदाधिकारी आणि विभागातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजसेवक महेंद्र सातपुते, प्रियंका सातपुते, ज्येष्ठ पत्रकार शेखर छत्रे, भरत शिंदे, रघू शेट्टी, शंकर शेट्टी, पुनम उदय पवार, करिश्मा सावंत, वैभव सावंत, ज्योती यांनी मोलाचे सहकार्य केले.