रत्नागिरी : आंबोली घाटात टेम्पो दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे
आंबोली घाट रस्त्यावरील सावरीचे वळण येथे गाडीवरील ताबा सुटल्याने जवळपास ७० ते ८० फूट खोल दरीमध्ये ४०७ टेम्पो कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.पुंडलिक सुरेश आसगावकर ( २९, रा. मांडवळे तालुका चंदगड ) असे त्याचे नाव आहे.चालक पुंडलिक आसगावकर हा आपल्या ताब्यातील ४०७ टेम्पोने चंदगड येथून गोवा येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून परत येत असताना आंबोली घाटातील सावरीचे वळण येथे अवघड वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी खोल दरीत कोसळली असावी असा अंदाजही पोलीसांनी व्यक्त केला आहे.