रत्नागिरी : दांडेआडम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही रत्नागिरी नगर परिषदेने हा प्रकल्प पूर्ण केलेला नाही. याबाबत २१ जानेवारी रोजी मनसेने निवेदन देऊन प्रकल्प न राबवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. तीन महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी नगर परिषदेला नोटीस पाठविली आहे.सर्वोच्च न्यायालयाने २०२०मध्ये रत्नागिरी नगर परिषदेला दांडेआडोम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून शहरातील कचरा तेथे टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही याबाबत नगर परिषदेने कच्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयात पालिका उदासीन?
साळवी स्टॉप येथे साठविलेल्या घनकचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर
जलप्रदूषण होत असून, डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. कचऱ्यासारख्या
अतिमहत्त्वाच्या विषयावर नगर परिषद उदासीन आहे, असा आरोप करण्यात आला आहे. कार्यवाही केलेली नाही. सध्या नगर परिषदेकडून साळवी स्टॉप येथे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडवर दररोज संपूर्ण शहराचा कचरा साठविला आहे.त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व प्रदूषण होत आहे. संविधानाच्या अनुच्छेद २१प्रमाणे जगण्याच्या अधिकारांतर्गत प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवा, पाणी,पर्यावरण उपभोगण्याचा अधिकारी दिला आहे. हा हक्क व अधिकारांवर गदा येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. विनाविलंब दांडेआडोम येथील प्रकल्प कार्यान्वीत करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे.अन्यथा सर्वोच्च न्यायालयात अवमान
याचिका दाखल करण्यात येईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.