
मंडणगड :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मंडणगड शाखेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आंबडवे येथील बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करुन सुरू झालेली रथयात्रा देव्हारे, मंडणगड शहर, लाटवण या ठिकाणी पोहोचली. यावेळी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले.
लाटवण येथील कार्यक्रमानंतर ही यात्रा तालुक्यातील पहिल्या दिक्षाभूमी असेलल्या टाकडे या गावी पोहोचली. येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर कादवण गावी या यात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी दलित मित्र दादासाहेब मर्चंडे, तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सरचिटणीस रामदास खैरे, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा दाभोळकर, जिल्हा संघटक विजय खैरे, जिल्हा सदस्य किरण पवार, अरविंद येलवे, संदेश खैरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील तांबे, सुरेश तांबे, संकेत तांबे, संदीप येलवे, स्वप्निल धोत्रे, विधान पवार, वीरेंद्र जाधव, मुरा तांडेल, आकाश पवार, अंकुश कासारे सत्यम जाधव, संतोष कासारे, भाई कासारे, जितेंद्र जाधव विजय खैरे, स्वप्निल धोत्रे, संकेत तांबे, गौरव मर्चंडे, विरेंद्र जाधव युवक पदाधिकाऱ्यांसह गावागावातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.