रत्नागिरी: राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री पालघर व सिंधुदुर्ग रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 06.23 वाजता पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व जन्मशताब्दी एक्सप्रेस ने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.20 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आगमन व स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे आगमन व भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी द्वारा आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 01.00 वाजता शासकीय विश्रामगृह, माळनाका, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
दुपारी 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह, माळनाका, जि.रत्नागिरी येथून चिपळूण कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता चिपळूण, जि.रत्नागिरी येथे आगमन व भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी द्वारा आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 06.30 वाजता चिपळूण, जि. रत्नागिरी येथून गुहागर कडे प्रयाण.सांयकाळी 07.30 वाजता गुहागर तालुका पत्रकार संघ द्वारा आयोजित गुहागर पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळयास उपस्थिती. रात्री 08.30 वाजता शासकीय विश्रामगृह, गुहागर, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्री 10.30 वाजता गुहागर येथून चिपळूण रेल्वे स्थानकाकडे रवाना. रात्री 11.45 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव.
रविवार 16 एप्रिल 2023 रोजी रात्री 00.28 वाजता चिपळूण येथून कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेल, जि. रायगड कडे प्रयाण.