☯️पाणी जपून वापरण्याचे देवरूख नगर पंचायतीच्या वतीने आवाहन
देवरूख: तीव्र उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन विचारात घेता बंधा-यातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने खालावत जाणार आहे. अपुरे पर्जन्यमान व विलंबाने मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट 2023 पर्यंत पुरेल अशा प्रकारे पाणी पुरवठ्याचे नियोजन आणि उपाययोजना करण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देवरुखमध्ये १८ एप्रिल पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
देवरूखात केवळ पर्शरामवाडी व धावडेवाडी बंधारा या जलस्त्रोतावरून पाणीपुरवठा होत आहे. निनोच्या प्रभावाने वाढत्या तापमानामुळे होणा-या बावामुळे पर्शरामवाडी व घावडेवाडी बांधा-यामधील पाणी प्रचंड कमी होत आहे. सद्यस्थितीत बंधा-यात केवळ 30 मे पर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
अल-निनोच्या प्रभावामुळेi मान्सूनचे आगमन विलंबने झाल्यास व त्यामुळे उपरोक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भीषण पाणीटंचाई उद्धभवू शकते. हे परिणाम लक्षात घेत काटकसरीने व जबाबदारीने पाणी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ कमी करता येईल. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाणी कमी वापर करून नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता यांनी केले.