जनशक्तीचा दबाव न्यूज | एप्रिल १४, २०२३..
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी ९ एप्रिल रोजी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारदेखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेचच, सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पासवान यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात ‘महागठबंधन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
राबडी देवींच्या इफ्तार पार्टीत चिरागच्या उपस्थितीने भाजपला धक्का बसला असणार याचे प्रमुख कारण म्हणजे मंत्री नित्यानंद राय यांनी गुरुवारी रात्री चिराग पासवान यांच्या पाटणा येथील निवासस्थानी अचानक भेट दिली. चिराग हा भाजपच्या जवळचा मानला जातो आणि अनेक प्रसंगी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘हनुमान’ असल्याचा दावा केला आहे, परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन चिरागला, ‘भाजपने त्याला गृहीत धरावे’ असे वाटत नाही आणि जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपशी जोरदार सौदेबाजी करता यावी म्हणून आपले पर्याय खुले ठेवायचे असावेत. LJP (रामविलास) सध्या एनडीएचा औपचारिक भाग नाही, परंतु येत्या काही महिन्यांत ते NDA मध्ये सहभागी होऊ शकतात.